छत्रपती संभाजीनगर येथील अंकुर कोचिंग क्लासेसमध्ये दर शनिवारी भरतो अमृतवर्ग
छत्रपती संभाजीनगर : येथील अंकुर कोचिंग क्लासेसमध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या संकल्पनेतून अमृत वर्ग यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. या वर्गाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार व सकारात्मक सवयी रुजवणे हा आहे. आजच्या धावपळीच्या आणि मोबाइलप्रधान काळात मुलांना अभ्यासाबरोबरच शिस्त, संस्कार आणि चांगल्या सवयी लागणे ही मोठी गरज बनली आहे. हीच बाब लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती नगर भागातील अंकुर कोचिंग क्लासेस येथे अत्यंत उपयुक्त असा अमृत वर्ग नियमितपणे घेतला जात आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी, सेमी-इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी चालणाऱ्या या क्लासेसमध्ये सौ. योगिता पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जात आहे. वेळेचे नियोजन, शिक्षकांचा आदर, पालकांचे ऐकणे, स्वच्छता, नीटनेटकेपणा, संयम, एकमेकांशी सुसंवाद आणि जबाबदारीची जाणीव हे गुण या वर्गातून मुलांमध्ये रुजवले जात आहेत. अमृतसखी सौ. मंजू कुलकर्णी दर शनिवारी येथे अमृतवर्ग घेतात.
संपर्क : अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत संस्थेचे विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड,
सेक्टर -४ सिडको, पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर - ४३१००९
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment