नांदेडमध्ये ब्राह्मण ब्रीझ नेटवर्कसोबत अमृत संस्थेची बैठक - अमृत महाराष्ट्र

नांदेडमध्ये ब्राह्मण ब्रीझ नेटवर्कसोबत अमृत संस्थेची बैठक

व्यावसायिक घडवण्याकरिता साह्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याची अमृत संस्थेची ग्वाही

नांदेडमध्ये ब्राह्मण ब्रीझ नेटवर्कसोबत अमृत संस्थेची बैठक मुख्य फोटो
नांदेडमध्ये ब्राह्मण ब्रीझ नेटवर्कसोबत अमृत संस्थेची बैठक अतिरिक्त फोटो

नांदेड : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड कार्यालयात ब्राह्मण ब्रीझ नेटवर्कसोबत (बीबीएन) बैठक आयोजित करण्यात आली होती. चार जानेवारीला झालेल्या या बैठकीची सुरुवात 'वन मिनिट इंट्रोडक्शन' उपक्रमाने झाली.

अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष कुलकर्णी यांनी अमृत संस्थेची आणि योजनांची सविस्तर माहिती देऊन अर्थसाह्य करणाऱ्या बँकांबाबत मार्गदर्शन केले. तसेच 'बीबीएन'मधील 20 व्यावसायिक एकत्र आल्यास डिजिटल मार्केटिंग, पॅकेजिंग व ब्रँडिंग या विषयांवर प्रशिक्षण सत्र आयोजित करण्याची तयारीही कुलकर्णी यांनी दर्शवली. अमृत संस्था व्यावसायिक घडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

या वेळी नांदेडच्या अमृतसखी मनीषा कुनसावळीकर यांनी उपस्थित सदस्यांची नोंदणी करून घेतली. विभागीय व्यवस्थापक ओंकार शेटे यांनी बीबीएनमधील सर्व व्यावसायिकांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. संक्रांतोत्सवाच्या प्रमोशनसाठी फक्त स्टॉलधारकांकरिता स्टेटस स्पर्धेची घोषणा अमोल कंडारकर यांनी केली.

या बैठकीला २५ सदस्य उपस्थित होते. “एकत्र येऊ या, व्यवसाय वाढवू या!” असा संदेश बीबीएनच्या नांदेड टीमने दिला. 'उद्योजक व्हायचे असेल तर अमृत आहे,' असा विश्वास अमृत संस्थेने दिला.

अधिक माहितीसाठी संपर्क :
सौरभ संतोष कुलकर्णी - 7391065472
नांदेड जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/

Publisher: सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 09:59 AM News publication time | Views: 815 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 05-01-2026 News publication date | Time: 09:59 AM News publication time | Views: 815 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement