अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात अमृत दिनदर्शिकेचे व्यावसायिकांना वितरण - अमृत महाराष्ट्र

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात अमृत दिनदर्शिकेचे व्यावसायिकांना वितरण

योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्याचे आश्वासन

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात अमृत दिनदर्शिकेचे व्यावसायिकांना वितरण मुख्य फोटो
अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात अमृत दिनदर्शिकेचे व्यावसायिकांना वितरण अतिरिक्त फोटो

मोर्शी (जि. अमरावती) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने विशेष दिनदर्शिका तयार करण्यात आली असून, तिचे वितरण सध्या राज्यभर सुरू आहे. या उपक्रमांतर्गत अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील व्यापारी बांधवांना अमृत दिनदर्शिका वितरित करण्यात आली. मोर्शी येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक अजित जोशी, निखिल ओझा, कीर्तेश शर्मा, पंकज पुरोहित, तसेच नेरपिंगळाई येथील नीलेश पांडे व कल्पना पाखोडे यांना दिनदर्शिका देण्यात आली.

अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी कौशल्यविकास, उद्योग प्रशिक्षण व स्वयंरोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात असून, वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे नवउद्योजकांना मोठा दिलासा मिळत आहे. या योजनांचा लाभ समाजातील अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन या वेळी मान्यवरांनी केले. त्याचप्रमाणे अमृत संस्थेच्या योजना समाजातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

अमृत संस्थेविषयी... 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in

केदार गोगरकर - 9112227635

अमरावती जिल्हा व्यवस्थापक, अमृत


Publisher: Deepak Gogarkar News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 04:50 PM News publication time | Views: 231 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: Deepak Gogarkar News publisher name | Date: 09-01-2026 News publication date | Time: 04:50 PM News publication time | Views: 231 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement