सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुवर्णरेखा पाटील यांच्याकडून प्रशंसा
वरोरा (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात आलेली अमृत दिनदर्शिका वरोरा तालुक्यात लक्ष्यित गटातील नागरिकांना वितरित करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी मानद सचिव सौ. सुवर्णरेखा पाटील यांनी अमृत दिनदर्शिकेचे कौतुक केले. गेल्या ४० वर्षांपासून त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण, प्रबोधन आणि मार्गदर्शनाचे अनेक उपक्रम राबवले आहेत. या दिनदर्शिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन मिळत असून, अमृत दिनदर्शिका समाजजागृतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विक्रम मोहन पांडे - 9834323727
चंद्रपूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ,
तुकूम, चंद्रपूर.
अमृत संस्थेविषयी
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपाल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment