शासकीय अधिकारी आणि लाभार्थ्यांना वितरण
जालना : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या स्वायत्त संस्थेने आपल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक विशेष व माहितीपूर्ण दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शासकीय अधिकारी, तसेच अमृत योजनेच्या लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, जिल्हा उपव्यवस्थापक चिंतेश जोशी, सत्यम अग्रवाल, महेश रोडे आदी उपस्थित होते.
अमृत दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा कालावधी जानेवारी २०२६ पासून एप्रिल २०२७ पर्यंत असून, इंग्रजी दिनदर्शिकेसोबतच हिंदू वर्ष, महिने व तिथींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका केवळ तारखांची नोंद नव्हे, तर मराठी परंपरा, पंचांग पद्धती आणि आधुनिक काळाच्या गरजांचा समतोल साधणारे एक उपयुक्त मार्गदर्शक साधन ठरत आहे.
या दिनदर्शिकेमध्ये अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम, लाभार्थ्यांसाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शनाचा समावेश असल्याने लाभार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही ती उपयोगी ठरणार आहे. सामाजिक व आर्थिक विकासाच्या उद्दिष्टांना पूरक असा हा उपक्रम असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
अधिक माहितीसाठी संपर्क :
अमृत जिल्हा कार्यालय,
दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.
मोबाइल : 7391065474
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment