हिंगोलीत महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयातही झळकली अमृत दिनदर्शिका - अमृत महाराष्ट्र

हिंगोलीत महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयातही झळकली अमृत दिनदर्शिका

महिला सक्षमीकरणाच्या योजनांचा होणार प्रसार

हिंगोलीत महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयातही झळकली अमृत दिनदर्शिका मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंगोली : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या संस्थेने प्रकाशित केलेली अमृत दिनदर्शिका हिंगोली जिल्हा महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात देण्यात आली. या दिनदर्शिकेत अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण उपक्रम व विविध कार्यक्रमांची माहिती नागरिकांना सहज समजेल अशा प्रकारे मांडण्यात आली आहे. यात महिला सक्षमीकरणाच्या योजनांचाही समावेश आहे.

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून अमृतच्या योजना प्रभावीपणे तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवण्यात अमृत दिनदर्शिका महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे अमृत आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन अमृत संस्थेच्या विविध योजना अधिक परिणामकारकपणे राबवण्यास मदत होणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 11-01-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 11-01-2026 News publication date | Time: 02:25 PM News publication time | Views: 84 Number of times this news has been viewed | District: hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement