दिनदर्शिका देण्यात आली भेट
निलंगा (जि. लातूर) : निलंगा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका श्रीमती मीनाक्षीताई देशपांडे यांची भेट घेऊन अमृत संस्थेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन त्यांना अमृत दिनदर्शिका भेट दिली. या वेळी अमृतसखी पल्लवी सबनीस उपस्थित होत्या.
या वेळी अमृत संस्थेच्या अनेक योजनांबद्दल सविस्तर चर्चा झाली. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती घेतल्यानंतर श्रीमती देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले. या माध्यमातून गरजू व बेरोजगारांना एक मोठी संधी प्राप्त झाली आहे, असे मत व्यक्त करून त्यांनी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील गरजूंनी संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment