केवळ आर्थिक मदत नव्हे, तर नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अमृत कार्यरत - अमृत महाराष्ट्र

केवळ आर्थिक मदत नव्हे, तर नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अमृत कार्यरत

फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्याकडून अमृत संस्थेचे कौतुक

केवळ आर्थिक मदत नव्हे, तर नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अमृत कार्यरत मुख्य फोटो
मुख्य फोटो

फलटण (जि. सातारा) : सामाजिक, आर्थिक व ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अमृत संस्थेच्या विविध योजनांचे फलटणचे विद्यमान आमदार सचिन पाटील यांनी विशेष कौतुक केले आहे. अमृत संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, युवक, महिला व छोट्या व्यावसायिकांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू असून, ही बाब समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, ती खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते.संस्थेच्या वतीने समन्वयक व प्रतिनिधी अविनाश कुलकर्णी यांनी आमदार सचिन पाटील यांची भेट घेऊन संस्थेची कार्यपद्धती, आर्थिक साह्य योजना, स्वयंरोजगार निर्मिती, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या वेळी आमदार पाटील म्हणाले, की 'आजच्या काळात केवळ आर्थिक मदत न करता नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दिशा देणाऱ्या योजना अधिक गरजेच्या आहेत. अमृत संस्था हेच काम प्रामाणिकपणे करत असून, युवकांना रोजगाराच्या संधी, महिलांना आर्थिक साह्य आणि छोट्या उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी आवश्यक पाठबळ देत आहे.'

ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत योजना पोहोचवणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य विकास घडवून आणणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रोजगार निर्मिती करणे, ही अमृत संस्थेची कार्यपद्धत उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा उपक्रमांना लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

https://mahaamrut.org.in/



Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 11:23 AM News publication time | Views: 233 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news
Publisher: अविनाश कुलकर्णी News publisher name | Date: 15-01-2026 News publication date | Time: 11:23 AM News publication time | Views: 233 Number of times this news has been viewed | District: satara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement