अहिल्यानगर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. ऋग्वेद गंधे यांचा 'अमृत'तर्फे सत्कार - अमृत महाराष्ट्र

अहिल्यानगर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. ऋग्वेद गंधे यांचा 'अमृत'तर्फे सत्कार

योजनांच्या प्रसारासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची ग्वाही

अहिल्यानगर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. ऋग्वेद गंधे यांचा 'अमृत'तर्फे सत्कार  मुख्य फोटो
अहिल्यानगर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. ऋग्वेद गंधे यांचा 'अमृत'तर्फे सत्कार  अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर : अहिल्यानगर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अ‍ॅड. ऋग्वेद महेंद्र गंधे यांचे अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नगर शहर व परिसरातील गरजू आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अमृत संस्थेसोबत समन्वयाने काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या शुभेच्छांचे पत्र अ‍ॅड. ऋग्वेद गंधे यांची भेट घेऊन त्यांना दिले. त्यांच्या आगामी समाजकार्यास यश लाभावे, अशी सदिच्छा या वेळी व्यक्त करण्यात आली. 

अ‍ॅड. ऋग्वेद गंधे हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र (भैया) गंधे यांचे चिरंजीव आहेत. भेटीमध्ये झालेल्या संवादात ऋग्वेद गंधे यांनी अमृत संस्थेच्या माध्यमातून लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी अधिकाधिक उपक्रम, प्रशिक्षण व विकासात्मक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. अमृत ही संस्था संशोधन, प्रशिक्षण, कौशल्यविकास व सामाजिक सक्षमीकरण या क्षेत्रात कार्यरत आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करून समाजातील लक्ष्यित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, याबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी त्यांची निवडणुकीपूर्वीही भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

अधिक माहितीसाठी

पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,

आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,

अहिल्यानगर - 414003

संपर्क क्रमांक : 9112228769

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 17-01-2026 News publication date | Time: 05:20 PM News publication time | Views: 895 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 17-01-2026 News publication date | Time: 05:20 PM News publication time | Views: 895 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement