उद्योजकतेला बळ देणारा कार्यक्रम
बुलढाणा : उद्योजकतेकडे वाटचाल करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृत कौशल्य उद्योग वर्धन हा सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची खास बाब म्हणजे हा उपक्रम फक्त वर्गातील शिकवणीपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योग उभारणीचा अनुभव देणारा आहे. उद्योग सुरू करण्यापासून ते उत्पादन, कच्च्या मालाची निवड, पॅकिंग, ब्रँडिंग, विक्री, डिजिटल मार्केटिंग, आर्थिक नियोजन, तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ कसा घ्यावा याबाबत सखोल व व्यवहार्य प्रशिक्षण यात दिले जाणार आहे. अमृत संस्थेचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमानी यांनी ही माहिती दिली.
‘करून शिकणे’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या प्रशिक्षणामुळे प्रशिक्षणार्थ्यांना उद्योगातील प्रत्यक्ष आव्हाने समजतील आणि आत्मविश्वासाने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची क्षमता प्राप्त होईल. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील युवक-युवती व नवउद्योजकांसाठी हा कार्यक्रम दिशादर्शक ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.
नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
जिग्नेश कमानी - 9112227637
बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत
पत्ता : अमृत जिल्हा कार्यालय,
फ्लॅट क्र. 305, तिसरा मजला,
बुलढाणा प्राइड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर,
बुलढाणा – 443001
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment