कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण संघांच्या सहकार्याने आयोजन
पेठवडगाव (कोल्हापूर) : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे अमृत मेळावा होणार आहे. २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता त्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण संघांच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. यामध्ये प्रशिक्षण, स्वयंरोजगार, तसेच व्याजपरताव्याच्या स्वरूपात अर्थसाह्य देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. या योजनांची माहिती देण्यासाठी अमृत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अमृत मेळाव्यात अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
पेठवडगाव शहरासह आसपासच्या परिसरातील लक्ष्यित गटातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक प्रशांत जोशी आणि पेठवडगाव ब्राह्मण समाज संघाचे अध्यक्ष संजय बुवा, उपाध्यक्ष वासुदेव अंबपकर व कार्यवाह नितीन सपाटे यांनी केले आहे.
दिवस : २७ जानेवारी २०२६
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : देवस्थळी हॉल, चावडीजवळ, पेठवडगाव
अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रशांत जोशी - ९११२२२८७६४
कोल्हापूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment