ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. विनायक गोविलकर यांच्याकडून अमृत संस्थेच्या योजनांची प्रशंसा - अमृत महाराष्ट्र

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. विनायक गोविलकर यांच्याकडून अमृत संस्थेच्या योजनांची प्रशंसा

अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयाला दिली सदिच्छा भेट

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. विनायक गोविलकर यांच्याकडून अमृत संस्थेच्या योजनांची प्रशंसा मुख्य फोटो
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. विनायक गोविलकर यांच्याकडून अमृत संस्थेच्या योजनांची प्रशंसा अतिरिक्त फोटो

नाशिक : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ सीए डॉ. विनायक गोविलकर यांनी नुकतीच अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी त्यांचे स्वागत केले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. त्या संस्थेच्या विविध सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील योजनांची सखोल माहिती खाडिलकर यांनी डॉ. गोविलकर यांना दिली. अर्थशास्त्र या आपला हातखंडा असलेल्या विषयाला अनुसरून खाडिलकर यांनी उपस्थितांना थोडक्यात, परंतु व्यापक परिचय करून दिला. 

अमृत संस्था लक्ष्यित गटातील नागरिकांसाठी तळागाळात झटून कार्यरत असल्याने संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांची त्यांनी आवर्जून प्रशंसा केली. तसेच हे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा मोलाचा सल्लादेखील दिला. खाडिलकर यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच अमृत संस्थेची दिनदर्शिकादेखील त्यांना देण्यात आली आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन संस्थेला कायम मिळावे, अशी इच्छा खाडिलकर यांनी व्यक्त केली. या वेळी अमृत संस्थेचे नाशिक जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी आणि अमृतमित्र मयूर हातवळणे उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 01-02-2026 News publication date | Time: 07:30 AM News publication time | Views: 230 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 01-02-2026 News publication date | Time: 07:30 AM News publication time | Views: 230 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

R
Rajendra kanade
01-02-2026 04:46 PM

Economist, Shree vinayakrao govilkar visited our AMRUT Nashik divisional office &gathered information about the AMRUT schemes of the govt.of maharashtra) This can be considered a positive step for the future of AMRUT, thanks Mr.vinayakrao sir

Write a Comment
0 / 50 words
Advertisement