सोलापुरात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ - अमृत महाराष्ट्र

सोलापुरात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ

जिल्ह्याच्या विविध भागांतील तरुणांचा उत्तम प्रतिसाद

सोलापुरात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ मुख्य फोटो
सोलापुरात अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहात प्रारंभ अतिरिक्त फोटो

सोलापूर : तरुणांना उद्योजकतेकडे वळवून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्याअंतर्गत सोलापूरमध्ये १० दिवसांच्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या विशेष प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन श्री. तापडिया यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुतार आणि राजेश खत्री होते. 'युवकांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा उद्योग सुरू करून नोकरी देणारे बनावे,' असे आवाहन या वेळी मान्यवरांनी केले. 'उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसाय नसून, तो एक दृष्टिकोन आहे. सोलापूरच्या तरुणांनी घेतलेला हा पुढाकार जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला नक्कीच गती देईल,' असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी यांनी संस्थेच्या विविध योजनांची माहिती देऊन युवकांसाठी असलेल्या संधींवर प्रकाश टाकला. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, हा १० दिवसांचा प्रवास त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरुदेव वाघमोडे, आर्या कुलकर्णी आणि मोरेश्वर मार्डीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

श्रेयस आनंद कुलकर्णी - 8669589834/8275457967

सोलापूर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

बिरुदेव वाघमोडे - 9284483216

उपव्यवस्थापक

आर्या कुलकर्णी - 9145281104 

अमृतसखी

प्रशिक्षणाचे ठिकाण : 9112228768 

१०८ ए, श्री साई अपार्टमेंट, फ्लॅट नंबर ३, 

तिसरा मजला, यतिराज हॉटेलच्या पुढे, 

ड्रायफ्रूट हाउसच्या बोळात, 

सातरस्ता, मोदीखाना, सोलापूर - ४१३००१

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Shreyas Kulkarni,Arya Kulkarni News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 10:27 AM News publication time | Views: 755 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news
Publisher: Shreyas Kulkarni,Arya Kulkarni News publisher name | Date: 02-02-2026 News publication date | Time: 10:27 AM News publication time | Views: 755 Number of times this news has been viewed | District: solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement