'अमृत'च्या लाभार्थ्याला प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशीच मिळाला ११५० रुपयांचा नफा - अमृत महाराष्ट्र

'अमृत'च्या लाभार्थ्याला प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशीच मिळाला ११५० रुपयांचा नफा

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'ईडीपी' प्रशिक्षणात शीतल तांबोळी यांच्या स्टॉलला मिळाला चांगला प्रतिसाद

'अमृत'च्या लाभार्थ्याला प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशीच मिळाला ११५० रुपयांचा नफा मुख्य फोटो
'अमृत'च्या लाभार्थ्याला प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशीच मिळाला ११५० रुपयांचा नफा अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. अमृत संस्थेतर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

या ईडीपी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शीतल तांबोळी यांनी प्रशिक्षणाच्या तिसऱ्याच दिवशी (तीन फेब्रुवारी) त्यांच्या गृहउद्योगात तयार होणाऱ्या वस्तूंचा छोटा स्टॉल अमृत जिल्हा कार्यालयात लावला. यात त्यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, लोणची, मेतकूट, कवठाची चटणी, चिंचाची चटणी, मसाला या उत्पादनांचा समावेश होता. या विक्रीतून त्यांना ११५० रुपयांचा नफा मिळाला.

या वेळी शीतल तांबोळी यांनी सांगितले, 'व्यवसायासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची सविस्तर माहिती अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) प्रशिक्षणामुळे मिळत आहे. त्याच माहितीच्या आधारे मी आज अमृत कार्यालयात माझा छोटा स्टॉल लावला. या उपक्रमामुळे मला मोठा आत्मविश्वास मिळाला असून, 'अमृतपेठ'च्या माध्यमातून आपल्याला खरोखरच चांगले मार्केट मिळू शकते याची खात्री पटली आहे.'

या वेळी त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थी व उद्योजकांना आवाहन केले, की 'आपण सर्वांनी 'अमृतपेठ'वर आपल्या वस्तूंची नोंदणी करावी व या संधीचा लाभ घ्यावा.'

अधिक माहितीसाठी संपर्क :

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, 

पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, 

हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 03-02-2026 News publication date | Time: 06:54 PM News publication time | Views: 3,832 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 03-02-2026 News publication date | Time: 06:54 PM News publication time | Views: 3,832 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement