दिग्रसमधील ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षणानंतर व्यक्त झाली प्रातिनिधिक भावना
दिग्रस (यवतमाळ) : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या सहकार्याने यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसमध्ये एक महिन्याचा ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाचा समारोप तीन फेब्रुवारी २०२६ रोजी झाला.
या प्रशिक्षणामध्ये लाभार्थ्यांना थिअरी तर शिकवण्यात आलीच; पण प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर अधिक भर होता. व्यवसायवृद्धी, स्वयंरोजगाराच्या संधी आणि उद्योजकता विकास याबाबतही यामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे लाभार्थ्यांना कौशल्यप्राप्ती तर झालीच आहे; पण त्यांच्या आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ झाली आहे.
समारोपाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे (एमसीईडी) प्रकल्प अधिकारी रूपेश शिरूरकर, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा उपव्यवस्थापक कामेश राखे, 'एमसीईडी'चे सहायक संजय जामनिक, तसेच प्रशिक्षिका सौ. वर्षा निघोट आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि अमृत संस्थेच्या योजनांमधून महिला व युवकांना कौशल्याधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन केले.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३
जिल्हा कार्यालय पत्ता :
स्वामी समर्थ विहार, पहिला माळा,
फ्लॅट क्रमांक ए-१,
अवधूतवाडी तिवारी चौक,
यवतमाळ - ४४५ ००१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment