अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित होणार ठाकूर समाजाची बैठक - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित होणार ठाकूर समाजाची बैठक

करणी सेनेचे नागपूर प्रभारी अमोल परमार यांनी अमृतच्या योजनांबद्दल व्यक्त केला आनंद

अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्यासाठी नागपुरात आयोजित होणार ठाकूर समाजाची बैठक मुख्य फोटो
मुख्य फोटो

नागपूर : अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या नागपूर कार्यालयाला करणी सेनेचे नागपूर प्रभारी अमोल परमार यांनी सदिच्छा भेट दिली आणि त्यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

अमृत ही संस्था लक्ष्यित गटांसाठी रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्यविकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी योजना राबवते. त्या विविध योजनांची माहिती परमार यांनी ऐकून घेतली. ठाकूर समाजासह सर्व लक्ष्यित समाजघटकांना या योजनांचा लाभ कसा देता येईल, याबाबत त्यांनी विशेष सकारात्मक चर्चा केली.

या वेळी परमार यांनी सांगितले, की अमृत संस्था लक्ष्यित गटासाठी एवढ्या व्यापक स्वरूपात कार्य करत असल्याची माहिती त्यांना प्रथमच मिळाली असून, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे. ठाकूर समाजातील युवक, महिला व गरजू घटकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजना पोहोचवण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

या संदर्भात लवकरच एक संयुक्त बैठक आयोजित करून सर्व समाजबांधवांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती देण्याचा मानस त्यांनी अमृत संस्थेचे नागपूर जिल्हा व्यवस्थापक हर्षल गद्रे यांच्याकडे व्यक्त केला. या बैठकीच्या माध्यमातून समाजातील अधिकाधिक लाभार्थ्यांना अमृत संस्थेच्या योजनांशी जोडण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीमुळे अमृत संस्था व करणी सेना यांच्यात समन्वय वाढून भविष्यात समाजहितासाठी प्रभावी उपक्रम राबवण्यास चालना मिळणार आहे.

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in


Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 02:20 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 02:20 PM News publication time | Views: 78 Number of times this news has been viewed | District: nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement