अचलपूरमध्ये व्यवसाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अमृत संस्थेच्या योजनांवर चर्चा - अमृत महाराष्ट्र

अचलपूरमध्ये व्यवसाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अमृत संस्थेच्या योजनांवर चर्चा

मिळाला सकारात्मक प्रतिसाद

अचलपूरमध्ये व्यवसाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी अमृत संस्थेच्या योजनांवर चर्चा मुख्य फोटो
मुख्य फोटो

अचलपूर (जि. अमरावती) : अचलपूर येथे व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष अजय अग्रवाल, तसेच त्यांचे सहकारी संजय अग्रवाल यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. अमृत संस्थेचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, तसेच जिल्हा उपव्यवस्थापक ऋषीकेश कथलकर उपस्थित होते.

या बैठकीमध्ये अमृतपेठ, अमृत पर्यटन, तसेच अमृत महाराष्ट्र या उपक्रमांवर सखोल चर्चा करण्यात आली. स्थानिक उद्योजकांना ऑनलाइन व ऑफलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पर्यटन क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधी वाढवणे आणि अमृत संस्थेच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे यावर विशेष भर देण्यात आला.

व्यवसाय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या योजनांविषयी सकारात्मक प्रतिसाद देऊन भविष्यात संयुक्त उपक्रम राबवण्याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. या बैठकीमुळे स्थानिक व्यवसायिक व उद्योजकांना अमृत संस्थेच्या योजनांची माहिती मिळाली आणि त्यांना नव्या संधींचे दालन खुले होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 10:15 AM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: केदार दीपक गोगरकर News publisher name | Date: 13-02-2026 News publication date | Time: 10:15 AM News publication time | Views: 85 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement