यवतमाळमध्ये अमृत संस्थेला मिळणार बंजारा क्लस्टरचे सहकार्य - अमृत महाराष्ट्र

यवतमाळमध्ये अमृत संस्थेला मिळणार बंजारा क्लस्टरचे सहकार्य

दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींच्या भेटीत झाली सकारात्मक चर्चा

यवतमाळमध्ये अमृत संस्थेला मिळणार बंजारा क्लस्टरचे सहकार्य मुख्य फोटो
यवतमाळमध्ये अमृत संस्थेला मिळणार बंजारा क्लस्टरचे सहकार्य अतिरिक्त फोटो

यवतमाळ : येथील यशस्वी उद्योजक, तसेच बंजारा क्लस्टरचे प्रवर्तक योगेश उत्तरवार आणि बंजारा क्लस्टरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आकाश राठोड यांनी अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या यवतमाळ जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती घेतली.

अमृत संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविले जाणारे कौशल्यविकास, उद्योजकता प्रोत्साहन व रोजगारनिर्मितीचे उपक्रम हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच भविष्यात अमृत संस्थेच्या विविध उपक्रमांना बंजारा क्लस्टरच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. या भेटीमुळे अमृत व बंजारा क्लस्टर यांच्यात समन्वय वाढून भविष्यात संयुक्त उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यास मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३३

जिल्हा कार्यालय पत्ता : 

स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, 

फ्लॅट क्रमांक ए-१, 

अवधूतवाडी, तिवारी चौक, 

यवतमाळ - ४४५ ००१  

ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 02:36 PM News publication time | Views: 81 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 02:36 PM News publication time | Views: 81 Number of times this news has been viewed | District: yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement